कोलकाता : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटजगतातील योगदानाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखालील दोन वर्ल्डकप जिंकण्याची किमया साधली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेही जेतेपद आपल्या नावे केले. 


भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या हस्ते धोनीला क्रिस्टल ट्रॉफी देण्यात आली. यावेळी स्टेडियममधील ५५ हजार प्रेक्षकांच्या तोंडी एकच नाव होते ते म्हणजे धोनी...धोनी...


धोनीने आपल्या वनडे करिअरमध्ये आतापर्यंतच्या २८३ सामन्यांत ५०.८९ च्या सरासरीने ९,११० धावा केल्यात. यातील नाबाद १८३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.