नागपूर : नागपूरच्या जामठा मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड या दोन संघादरम्यान वर्ल्डकपमधील पहिला मुकाबला रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. मात्र सामन्यापूर्वीच भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चांगलीच तयारी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या मते केवळ नशिबाच्या जोरावर विजय मिळत नाही तर त्यासाठी खूप मेहनत आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे असते. या सामन्यासाठी धोनीने विशेष रणनीतीही बनवलीये. 


अद्याप धोनी ब्रिगेडला न्यूझीलंडचा विजयरथ रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे त्यांचा विजय रथ रोखण्याच्या दृष्टीने आणि वर्ल्डकपमध्ये विजयाची बोहनी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. न्यूझीलंडविरोधात भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि युवराज सिंग.


दुसरीकडे गोलंदाजांची धुरा जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यावर असेल. भारताकडे जरी दमदार क्रिकेटपटू असले तर न्यूझीलंडला कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडेही केन विल्यमसन्स, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, टीन साऊदी, कोरे अँडरसन यांच्यासारखे क्रिकेटपटू आहेत त्यामुळे टीम इंडियाला गाफील राहून चालणार नाही.