नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक त्याच्या खेळापेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलाय. वयाच्या १०व्या वर्षापासून दिनेशने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये २००४मध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर कार्तिकची भारतीय संघात वर्णी लागली. यादरम्यान कार्तिक आणि त्याची लहानपणीची मैत्रीण निकिता हिच्याशी अफेयर सुरु होते. 


अखेर अनेक वर्षांच्या अफेयरनंतर २००७मध्ये कार्तिक आणि निकिता विवाहबद्ध झाले. मात्र त्यांचे हे नातं अधिक काळ टिकलं नाही. २०१२मध्ये ते दोघेही वेगळे झाले. 


निकिताचा मुरलीशी विवाह


२०१२मध्ये आयपीएलदरम्यान कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजय यांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जेव्हा हे कार्तिकला समजले तेव्हा त्याने निकितापासून वेगळे होण्याचा निर्णय़ घेतला. २०१२मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर निकिताने मुरली विजयशी लग्न केले. 


कार्तिकच्या जीवनात दीपिकाचा प्रवेश


त्यानंतर कार्तिकच्या जीवनात स्कॉवशपटू दीपिका पल्लीकलचा प्रवेश झाला. २०१३मध्ये या दोघांची भेट झाली. दोन वर्षे अफेयरनंतर २०१५मध्ये हे दोघेही विवाहबद्ध झाले.