रिओ : भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. दीपा 15.066गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. दीपाला भलेही मेडल जिंकता आलं नसेल मात्र तिन तिच्या सर्वोत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं. आपल्याला पदक मिळवता न आल्याने तिने चाहत्यांची ट्विटरवरुन माफी मागितली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


जिमनॅस्ट क्वीन दीपाचं नाव रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर पाहिलं आणि सव्वाशे कोटी भारतीयांचा काळजाचा ठोका चुकला. दीपाचं ऑलिम्पिक मेडल अवघ्या काही पॉईंट्सनी हुकल्यानं तमाम भारतीय चाहते काहीसे निराश झाले. 


मात्र आपल्या पहिल्या-वहिल्या ऑलिम्पिकमध्ये दीपा लढली आणि चौथं स्थानं गाठलं. मेडलच्या एवढं जवळ येऊन तिला रिकाम्या हातानं परतावं लागेल. अस असलं तरी, तिनं आपल्या कामगिरीनं अवघ्या भारतीयांचचं नव्हे तर जभरातील क्रीडा चाहत्यांचं मनं जिंकलं. 


वॉल्ट या प्रकारात अमेरीकेच्या बिल्स सिमन्सनं गोल्ड, रशियाच्या पासेका मारीयानं सिल्व्हर तर स्विर्झलंडच्या स्टेईंगुर्बर गुलईलियानं ब्राँझ मेडल मिळवलं. दरम्यान ऑलिम्पिकमध्ये पात्र होत अंतिम फेरी गाठणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय ठरली.