`तोपर्यंत पाकिस्तानमध्ये येऊ नका`
पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या असुरक्षित आहे, त्यामुळे परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं दिला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या असुरक्षित आहे, त्यामुळे परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं दिला आहे. पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 62 प्रशिक्षणार्थी आणि पाकिस्तानच्या दोन जवानांना प्राण गमवावा लागला. याबद्दल प्रतिक्रिया देताना शोएबनं हे वक्तव्य केलं आहे.
2009मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना श्रीलंकेच्या टीमवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय टीम क्रिकेट खेळण्यासाठी गेली नाही. सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कपही रद्द करण्यात आला होता.