मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमपासून १३ किलोमीटर दूर माटुंगा जिमखान्यामध्ये इतिहास रचला आहे. येथे खेळल्या गेलेल्या स्कूल लीगमध्ये टी-20 सामन्यामध्ये १९ वर्षाच्या रुद्र दांडेने 67 बॉलमध्ये नाबाद 200 रन करत इतिहास रचला आहे.मुंबई क्रिकेट एसोसिएशन द्वारा आयोजित आबिस रिजवी चँपियंस ट्रॉफी सुपर-8 कॉलेज टी-20 टूर्नामेंटमध्ये रिजवी आणि पी डालमिया कॉलेजमध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात रूद्रने 21 चौकार आणि 15 सिक्स ठोकत रेकॉर्ड बनवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुद्रने फक्त 39 बॉलमध्ये शतक ठोकलं. रूद्रच्या आधी फेब्रुवारीमध्ये एक टी-20 मॅचमध्ये दिल्लीच्या मोहित अहलावतने 322 रन्सची तुफानी खेळी केली होती.


आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितलं तर फर्स्ट क्लास प्लेयर म्हणून सर्वात मोठा स्कोर करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या धानुका पाथिराणाच्या नावावर आहे. धानुकाने 2007 मध्ये लंकाशायरसाठी खेळतांना 72 बॉलमध्ये २७७ रन्स केले होते.


रुद्र दांडेच्या या खेळीने रिजवी कॉलेजने 20 ओव्हरमध्ये दोन विकेट गमवत 322 रन्सचा डोंगर उभारला. डालमिया कॉलेजची टीम 10.2 ओवरमध्ये 75 रनवर ऑलआउट झाली. रिजवी कॉलेजने हा सामना 247 रन्सने जिंकला.