ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी, दंडात्मक कारवाई
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली.
ड्युप्लेसिसची होबार्ट टेस्टमधील 100 टक्के मॅच-फी कापण्यात आलीय. मात्र, यामुळे या आठवड्यात होणा-या अॅडलेड टेस्ट खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झालाय.
आयसीसीच्या 2.2.9 कलाम अंतर्गात तो दोषी आढळलाय. अॅडलेडमध्ये आयसीसीसमोर ड्युप्लेसिसची सुनावणी झाली.
ड्युप्लेसिस दोषी आढळल्यानंतर क्रिकेट जगतामध्ये वादंग निर्माण झाला होता. त्याच्यावर एका मॅचची बंदी होणार असल्याची शक्यताही होती. मात्र, आयसीसीनं अखेर ड्युप्लेसिसवर दंडात्मक कारवाई केली.