आयपीएलमध्ये पुण्याच्या चिंता वाढल्या
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सच्या समस्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
पुणे: यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सच्या समस्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कॅप्टन धोनीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पुणे सहाव्या क्रमांकावर आहे.
पुण्याचा खेळाडू केव्हिन पिटरसन आधीच आयपीएलमधून आऊट झाला आहे, आणि आता पुण्याचा ओपनर फॅप डुप्लेसिसलाही आयपीएलला मुकावं लागणार आहे. डुप्लेसिसचं बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला आता 6 आठवडे क्रिकेट खेळता येणार नाही.
यामुळे वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्राय सीरिजलाही डुप्लेसिसला खेळता येणार नाही. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 जूनपासून या ट्राय सीरिजला सुरुवात होणार आहे.