ड्वेन स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिथने वेस्ट इंडिजसाठी शेवटचा सामना २०१५ वर्ल्डकपमध्ये खेळला होता. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2003 मध्ये पदार्पण केले होते. वनडेमध्ये एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. स्मिथने वनडे करिअरमध्ये 1560 धावा केला आहेत तर 61 विकेट्स घेतल्या आहेत.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिथने वेस्ट इंडिजसाठी शेवटचा सामना २०१५ वर्ल्डकपमध्ये खेळला होता. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2003 मध्ये पदार्पण केले होते. वनडेमध्ये एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. स्मिथने वनडे करिअरमध्ये 1560 धावा केला आहेत तर 61 विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाकडून स्मिथ सध्या खेळतोय. कराची किंग्ज संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी स्मिथने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
33 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 582 धावा केल्या आहेत. स्मिथ आयपीएल, कॅरेबियन प्रिमियर लीग, बांगलादेश प्रिमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो आहे.