वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश
टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.
नवी दिल्ली : टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.
इंग्लंडचा ओपनर जेसन रॉयने पहिल्याच षटकात ४ चौकार लगावले आणि त्याचे मनसुबे साफ केले. विस्फोटक खेळी करत रॉयने २६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. १७.१ बॉल्समध्ये सामना जिंकत इंग्लंडने फायनलमध्ये येणाऱ्या संघाला इशाराच देऊन टाकला.
गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या सेमिफायनलचा सामना रंगणार आहे. जो संघ जिंकेल त्याचा सामना फायनलमध्ये इंग्लंडसोबत होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष आहे.