राजकोट : टेस्टच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लिश टीमचं वर्चस्व दिसून आलं. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर 4 विकेट्स गमावून 311 रन्सपर्यंत मजल मारली. मोईन अली 99 रन्सवर आणि बेन स्टोक्स 19 रन्सवर नॉटआऊट आहेत. राजकोटच्या पिचवर  कोहलीचे बॉलर्स अपयशी ठरले.


इंग्लिश टीमकडून जो रुट आणि मोईन अली यांच्यातील चौथ्या विकेट्ससाठी झालेली 179 रन्सची पार्टनरशिप अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. भारताकडून आर. अश्विननं दोन आणि जाडेजा, उमेश यादवनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली. आता टेस्टच्या दुस-या दिवशी कोहलीच्या बॉलर्ससमोर इंग्लंडच्या बॅट्समनना झटपट आऊट करण्याचं आव्हान असेल.