मुंबई: क्रिकेटपटूंवर त्यांचे चाहते मनापासून प्रेम करतात, त्यांनी केलेली सगळी रेकॉर्ड्स, त्यांनी जिंकवून दिलेल्या मॅच सगळ्यांचाच लक्षात राहतात, पण क्रिकेटर म्हणून प्रसिद्धी मिळवण्याच्या आधी हे खेळाडू काय काम करायचे हे मात्र त्यांच्या फॅन्सना माहिती नसतं. हे खेळाडू काय काम करायचे त्यावर एक नजर टाकूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


 


 


 


एम.एस.धोनी


 



भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन असलेला धोनी रेल्वेमध्ये टीसी होता. खडगपूर रेल्वे स्टेशनवर धोनी टीसीचं काम करायचा


एबी डिव्हिलियर्स


 



एबी डिव्हिलियर्स क्रिकेटबरोबरच रग्बी, हॉकी, बॅडमिंटन यासारख्या खेळांमध्येही चॅम्पियन आहे. डिव्हिलियर्स अंडर 19 नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियन होता, याबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय हॉकी आणि फूटबॉलच्या टीममध्येही त्याची निवड झाली होती. डिव्हिलियर्सला विज्ञानातल्या शोधासाठी नेल्सन मंडेला मेडलही मिळालं आहे. पण त्यानं क्रिकेटमध्ये करियर करायचा निर्णय घेतला. 


शेन बाँड


 



न्यूझिलंडचा या फास्ट बॉलरनं अनेक दिग्गज बॅट्समनना सळो की पळो करुन सोडलं. पण क्रिकेटर व्हायच्या आधी शेन बाँड न्यूझिलंडमध्ये पोलीस होता. पोलीस भरतीवेळी मिळालेल्या प्रशिक्षणाचा फायदा क्रिकेटमध्ये झाल्याचं शेन बाँडनं मान्य केलं आहे. 


मिचेल जॉन्सन


 



ऑस्ट्रेलियाचा हा फास्ट बॉलर क्रिकेटर व्हायच्या आधी ट्रक ड्रायव्हर होता. मिचेल ट्रकमधून प्लंबिगचं साहित्य एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवायचा.



ब्रॅड हॉज


 



ऑस्ट्रेलियाचा हा बॅट्समन क्रिकेटर म्हणून यशस्वी होण्याआधी ऑस्ट्रेलियामध्ये पेट्रोल पंपावर काम करायचा.


नॅथन लायन


 



ऑस्ट्रेलियाचा हा स्पिनर कॅनबेरामध्ये पिच क्युरेटर होता. डॅरेन बॅरीला त्याचं क्रिकेटमधली समज कळली आणि त्यानंच नॅथनला क्रिकेट खेळायला भाग पाडलं. 


इयन चॅपल


 



ऑस्ट्रेलियाचा हा माजी कॅप्टन सध्या कॉमेंट्रेटर म्हणून प्रसिद्ध आहे, पण क्रिकेट खेळण्याआधी इयन चॅपल बेसबॉल खेळाडू होता.