मुंबई : राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीने ग्रासले आहे, पुढील वर्षी शेती पेरायची किंवा नाही, यावर विचार करणे दुष्काळाने भाग पाडले आहे.


रासायनिक शेती तोट्याची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या पुढील पिढीने रासायनिक खते, किटकनाशके यांचा हिशेब लावण्यास सुरूवात केली आहे. हिशेबात रासायनिक खतांनी आणि किटकनाशकांचा शेतीला फारसा फायदा झाला नसल्याचं चर्चेतून समोर येत आहे. 


उत्पन्नापेक्षा खर्च जास्त


उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल, तर रासायनिक खतं आणि किटकनाशक का वापरायची असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. महागळी खते आणि किटकनाशकं न वापरता स्वस्तात काय करता येईल यावर नवी पिढी सतत शोध घेत असल्याचं दिसतंय, अनेकांनी झिरो बजेट फार्मिंगकडे मोर्चा वळवला आहे.


खत-किटकनाशक कंपन्या रडतील


रासायनिक खते आणि किटकनाशके न वापरता शेती केली तरी पुढील काळात कंपन्यांना याचा फटका बसणार असल्याचं समोर येत आहे. हा फटका कोट्यवधी रूपयांच्या घरात असू शकतो, जर शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि किटकनाशकं न वापरता शेती केली.