मेलबर्न : रॉजर फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला आहे. अत्यंत रोमहर्षक अशा ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फेडररनं राफेल नदालवर पाच सेटमध्ये मात केली. फेडररनं फायनलमध्ये नदालला 6-4, 3-6,6-1,3-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभूत केलं. फेडररचं टेनिस करिअरमधलं हे 18वं ग्रँडस्लॅम आहे.