युरो कप : पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये युरो कपची मेगा फायनल रंगणार आहे. जर्मनीला पराभूत करुन फायनल गाठणा-या यजमान फ्रान्स विजेतेपदासाठी फेव्हरिट असेल. तर  फ्रान्सला पराभवचा धक्का देण्याच्या उद्देशानचं अंडरडॉग पोर्तुगाल मैदानात उतरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस्तियानो रोनाल्डोची पोर्तुगाल टीम आणि यजमान फ्रान्समध्ये युरो कपची ट्रॉफी जिंकण्यासाठी घमासान रंगेल. दोन्ही देशांचे पाठिराखे आपापली टीम जिंकावी यासाठी त्यांना चीअर करायाला मैदानात उपस्थित असतील. पोर्तुगालकडून ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नानी हे दोन प्लेअर सेटर ऑफ अट्रॅक्शन ठरतील. तर यजमान फ्रान्सकडून गोल्डन बॉलचा प्रमुख दावेदार असलेला अँटोनी ग्रीझमन आपल्या टीमला विजेतेपद मिळवून देण्यास आतूर असेल. 


फ्रान्स जेव्हा-जेव्हा मेजर टुर्नामेंटचं यजमानपद भूषवतो. त्या-त्यावेळी फ्रान्स वितेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरते. मग तो 1984चा युरो कप असो, वा 1998 चा वर्ल्ड कप... आता याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी फ्रान्सची टीम प्रयत्नशी असेल. मात्र, त्यांना ख्रिस्तियानो रोनाल्डो नावचं वादळ रोखण्याचं मोठं आव्हान असेल. वेल्सविरुद्धच्या सेमी फायनल मॅचच्या पहिल्या हाफमध्ये रोनाल्डोची कामगिरी अपेक्षित झाली नाही. मात्र, सेकंड हाफमध्ये त्यानं आपला खेळ असा काही सुधारला की, त्यामुळे पोर्तुगालला युरो कप फायनल गाठण्यात यश आलं. 


रोनाल्डोला आजवर पोर्तुगालला कुठलीही मोठी टुर्नामेंट जिंकून देता आली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याकडे रोनाल्डोचं लक्ष्य असेल. 18 वर्षांनी पोर्तुगालची टीम युरो कपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. आता रोनाल्डोचा झंझावात पोर्तुगालला युरो कपची ट्रॉफी जिंकून देतो... की, फ्रान्सची टीम युरोपियन चॅम्पियन होते याकडेच तमाम फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असेल.


लाईव्ह मॅच : पोर्तुगाल वि. फ्रान्स फायनल