नवी दिल्ली : आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्यासाठी त्याला ब्रिटनच्या अँडी मरे, फ्रेंचच्या राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडच्या स्टानिसलास वावरिंका यांच्या आव्हानाला सामोर जावं लागेल. 


दरम्यान, या फ्रेंच ओपनमध्ये स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्याचे चाहते नाराज झालेत. तर वुमन्स टेनिसपटूमध्ये अमेरिकेच्या अव्वल मानांकित सेरेना विलियम्सच्या कामगिरीकडे तमाम टेनिस चाहत्यांचं लक्ष असेल. 


तर भारताकडून वुमन्स डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर मार्टिना हिंगिसला मातीच्या कोर्टवर पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम जिंकण्याचीही संधी आहे. 


भारतीय टेनिसप्रेमींना मिर्झाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता सानिया आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.