नागपूर : दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे  इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. 


या निर्णयामुळे आम्ही खूप नाराज झालो.  या निर्णयामुळे २० व्या षटकात मॅच संपूर्णपणे फिरली. असा फलंदाज ज्याने ४० चेंडू खेळले आहेत, तो अशा  चुकीच्या निर्णयावर बाद झाला हे खूप घातक होते. हा निर्णय आमच्या विरूद्ध गेला, असेही मॉर्गनने सांगितले.