नवी दिल्ली : टीम इंडिय़ाचा कर्णधार एम.एस.धोनीवर तयार होणाऱ्या बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’  संदर्भात मत व्यक्त करताना, क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकवर आपला विश्वास नसल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकातील ५ पैकी ४ सामन्यात अर्धशतक झळकावूनही टीम इंडियामधून त्याला वगळल्याने गौतम गंभीरने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. 


गंभीरच्या मते क्रिकेटपटूंच्या ऐवजी ज्यांनी देशाची सेवा केली, त्यांच्या जीवनावरच चित्रपट निर्माण केले जावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली. याशिवाय त्याने क्रिकेटपटू बायोपिक तयार करण्यासाठी पात्र नसल्याचे मतही व्यक्त केलं आहे.