पुणे: शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या मॅचमध्ये गुजरातनं पुण्यावर 3 विकेटनं विजय मिळवला आहे. 196 रनचा पाठलाग करताना याही मॅचमध्ये गुजरातला स्मिथ आणि मॅक्कलमनं चांगली सुरुवात करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिथनं 37 बॉलमध्ये 63 तर मॅक्कलमनं 22 बॉलमध्ये 43 रन केल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या रैनानं(34) आणि दिनेश कार्तिकनं (33) रन करून गुजरातचा विजय सोपा केला. शेवटच्या बॉलला एक रन पाहिजे असताना जेम्स फॉकनरनं गुजरातला जिंकवून दिलं. 


या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातनं पहिेले पुण्याला बॅटिंगला पाठवलं. पुण्याची सुरुवात मात्र खराब झाली. ओपनिंगला आलेला सौरभ तिवारी फक्त एक रनवर आऊट झाला. त्यानंतर स्टिव्ह स्मिथची शानदार सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या हाफ सेंच्युरीमुळे पुण्यानं 20 ओव्हरमध्ये 195 रनपर्यंत मजल मारली. 


स्टिव्ह स्मिथनं 54 बॉलमध्ये 101 रनची खेळी केली, यामध्ये आठ फोर आणि पाच सिक्सचा समावेश होता. तर अजिंक्य रहाणेनं 45 बॉलमध्ये 53 रन केल्या. 


या विजयामुळे गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. आता गुजरातकडे सात मॅच खेळल्यानंतर 12 पॉईंट्स झाले आहेत. पुण्याची परिस्थिती मात्र बिकट होत चालली आहे. सात मॅच खेळल्यानंतर पुण्याकडे फक्त चार पॉईंट्स आहेत.