मुंबई : गौतम गंभीर अखेर टीम इंडियात परतला आहे. जखमी लोकेश राहुलच्या जागी गौतम गंभीरला टीममध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
ईशांत शर्माच्या जागी जयंत यादवची निवड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडसोबत सुरू खेळवल्या जाणाऱ्या उर्वरित 2 टेस्टसाठी गौतम गंभीर आणि जयंत यादव खेळणार आहे.


यापूर्वी गौतम गंभीरची टीम इंडियात निवड न झाल्याने, गंभीरने अप्रत्यक्षपणे एसएम धोनीवर टीका केली आहे.