नवी दिल्ली : भज्जी आता रेससर झालाय. जालंधरमध्ये द ग्रेट खलीच्या अकादमीमध्ये हरभजनसिंगनं एका पहलवानाला मिनिटभरात चित केलं. खालसा नामक पहलवानाला भज्जीनं हरवलं. स्वत: खलीलाही हरभजनसिंगचे हे डाव पाहून आश्चर्य वाटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भज्जी आणि खलीची मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी खली भज्जीच्या घरी जेवणासाठी गेलेला. त्यानंतर मात्र मैत्री निभावण्याची पाऴी होती भज्जीची. त्यानंही मैत्रीखातर मग खलीच्या अकादमीत हजेरी लावली. 


खलीनं भज्जीला गदा देऊन सन्मानित केलं. त्यानंतर खालसा या पहलवानानं भज्जीला आव्हान दिलं. मग भज्जीनंही न राहवून दोन हात केलेच... भज्जी रेसलरचं दिसतात असंही यावेळी खलीनं म्हटलं. क्रिकेटचा विषय निघताच भज्जीनं कुंबळेला शुभेच्छा दिल्या.