मुंबई : वर्ल्डकपमध्ये १५ जणांच्या चमूमध्ये भारताचा स्पिनर हरभजन सिंगचा समावेश तर करण्यात आलाय मात्र त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही. यावरुन सोशल मीडियावर हरभजनची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या खिल्ली उडवणाऱ्यांना हरभजनने चांगलेच प्रत्युत्तर दिलेय. एका यूझरने ट्विट केले होते की‘भाई तेरा इंडिया टूर कैसा चल रहा है, मजा आ रहा होगा? फ्री के होटल्स, लंच, डिनर, सब कुछ। मस्त लाइफ है।’ हे ट्विट वाचून हरभजन चांगलाच भडकला.


यानंतर भज्जीने ‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार… और तुम उनमें से एक हो।’अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतर भज्जीच्या चाहत्यांनी हे प्रकरण हाताळले आणि भज्जीवर टीका करण्यांना चांगलेच सुनावले.