मुंबई : फिरकी गोलंदाज हजभजन सिंगने अनेकांना क्लिनबोल्ड केले आहे. भज्जीने धक्कादायक खुलासा केला आहे. शोएब अख्तर यांने एकदा मला मारण्याची धमकी दिली होती. त्याने मला माझ्या खोलीत येऊन मारले. तसेच युवराज सिंगलाही मारले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएबने मला म्हटले होते, तुला मी मारेन. त्यावेळी मी त्याला आव्हान दिले. बघुया कोणाच्यात किती दम आहे. त्यावेळी शोएब आमच्या रुममध्ये आला. त्याने मला आणि युवीला मारले. त्याला आवरणे कठिण गेले. त्याची धप्पड जोरात होती. आजही मला शोएबची भीती वाटते, असे भज्जीने सांगितले.


शोएब मला नेहमी तंग करत असे. तो आमच्यासोबत बसत असे. आमच्यासोबत जेवणही घ्यायचा. तो आमच्यातील एक होता. त्याने एके दिवशी मला सिक्स मारण्याचे आव्हान दिले. त्यावेळी मी त्याचे आव्हान स्वीकारले. ज्यावेळी मी त्याला सिक्स मारला, त्यावेळी तो स्तब्ध राहिला. त्यानंतर त्याने दोन बाऊंसर टाकले. मी ते चुकवले. त्यानंतर त्याने मला अपशब्द वापरला. त्यावेळी मी त्याला चोख उत्तर दिले. त्यानंतर मॅच संपल्यानंतर आम्ही एकत्र बसलो. त्यावेळी काहीही दोघांत झाले नसल्याचे आम्ही वागलो.


आयपीएलच्यावेळी एस श्रीसंतच्या कानाखाली थप्पड मारली. त्यावेळी त्याची नौटंकी होती. माझी चूक एव्हढीच होती की, मी मैदानावर त्याला मारले. ही मी चूक मान्य केली आहे. ज्यावेळी मी त्याला मारले त्यावेळी तो रडला. त्यावेळी मी जोरात त्याला थप्पड मारली. ही माझी चूक होती. आजही याबद्दल माफी मागतो, असे भज्जीने म्हटले.