विशाखापट्टणम: भारताचा स्टार ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण त्याचा उल्लेख ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं मंत्री म्हणून केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी भारतीय संघ विशाखापट्टणममध्ये दाखल झाला आहे. तिकडे दाखल झाल्यानंतर रोहित शर्माचं जसं एखाद्या मंत्र्याचं स्वागत होतं, तसंच हार घालून स्वागत करण्यात आलं. 


रोहित शर्माच्या असाच हार घातलेला एक फोटो हरभजननं ट्विट केला आहे. माननीय मंत्री रोहित शर्मा विशाखापट्टणमध्ये आले आहेत. त्यांनी नागरिकांना आश्वासनं दिली आहेत, ही आश्वासानं पूर्ण करा असंही हरभजन या ट्विटमध्ये म्हणाला आहे.