नवी दिल्ली : इंग्लडची महिला क्रिकेटर डॅनिअल व्याटने रविवारी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये विराट कोहलीला स्पेशल प्लेअर म्हटले आहे. व्याटने ट्विट करून लोकांना विराट कोहलीची शानदार इनिंग पाहण्याची विनंती केली आहे. त्याला स्पेशल खेळाडू म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे डॅनिअल व्याटने  २०१४ मध्ये एक इंटरेस्टिंग ट्विट केले होते. त्यानंतर सर्वात प्रथम भारतीय मीडियाचे लक्ष्य वेधले होते. 


डॅनिअलने २०१४ मध्ये विराटला ट्विट करून लग्नासाठी प्रपोज केले होते. डॅनिअलने विराट कोहलीच्या शानदार हाफ सेंच्युरीनंतर ट्विट करून ही इच्छा व्यक्त केली होती. २०१४ मध्ये आयसीसी वर्ल्ड टी-२० मध्ये विराटने दक्षिण आफ्रिकेविरोधात शानदार खेळी केली होती आणि अर्धशतक बनविले होते.