कराची : पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने हाँगकाँग टी -20 ब्लिट्झ स्पर्धेत सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिसबाह याने एकाच षटकात ही कामगिरी केलेली नाही. त्याने खेळलेल्या सलग सहा चेंडूमध्ये मिसबाहने ही कामगिरी केली. ही कामगिरी करणारा मिसबाह हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे. 


मिसबाहने हाँगकाँग आयलंड संघाकडून खेळताना जॅग्वार्स संघाविरुद्धच्या सामन्यात एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. त्यानंतर विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सईद अजमलने एक धाव काढली आणि पुन्हा मिसबाह स्ट्राईकवर आला. मिसबाहने त्यानंतर सलग चार षटकार आणि एक चौकार लगावला.


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मिसबाहला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचे आदेश दिले होते. त्याने आपल्या बॅटनेच प्रत्युत्तर दिले आहे. 2007ला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंग याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा षटकार ठोकले होते.