मुंबई : महेंद्रसिंग धोनीने बुधवारी त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा एकाएकी निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मैदानावर शांत दिसणारा धोनी हा निर्णय जाहीर करण्याच्या आधीही शांत होता. असा काही निर्णय जाहीर करणार याची कल्पनाही कोणाला आली नव्हती.  


हा निर्णय जाहीर कऱण्याआधी तो नागपूरमध्ये रणजीमधील झारखंडच्या टीमसोबत फुटबॉल गेम खेळत होता. त्यामुळे यानंतर धोनी इतका मोठा निर्णय सांगेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. 


गुजरातविरुद्धच्या रणजी सामन्यात झारखंडचा पराभव झाल्यानंतर धोनीने आपल्या रुममध्ये पार्टी ठेवली होती. यावेळी झारखंडच्या क्रिकेटपटूंसाठी जेवणाचेही आयोजन करण्यात आले. 


त्यानंतर अचानकपणे धोनीने आपण वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले.