मुंबई : भारत वेस्टइंडिज सामना वानखेडेवर खेळवला जाणार आहे, यातील चार सामन्यांमध्ये ख्रिस गेल आऊट झाला आहे, त्यातील तीन वेळेस त्याला स्पिनर्सने आऊट केलं आहे. 


ख्रिस गेलला कसं थोपवायचं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस गेलचा हा रेकॉर्ड पाहून टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यावेळेस नक्कीच ख्रिस गेलला थोपवण्यासाठी ऑफ स्पिनर अश्विनचा वापर करणार आहे.


धोनीकडून या आधी गेल विरूद्ध अश्विन


याआधी धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आर अश्विनचा वापर केला आहे. टी२० क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगला ९ वेळेस दोन्ही आमने सामने आलेले आहेत. यात सात वेळेस धोनीने नव्या बॉलिंगची जबाबदारी अश्विनकडे दिली आहे, तर एका वेळेस प्रयोग म्हणून धोनीने त्याचा वापर केलाय.


अश्विनला चार वेळेस गेलला आऊट करण्यात यश आलं आहे. हाच मुद्दा अश्विन, धोनी आणि गेलच्या डोक्यातही असेल. अश्विनला धोनी गेलची विकेट काढण्यासाठी बॉल देईल असं वाटत नाही, पण असं होण्याची शक्यता जास्त आहे.


मी मानसिकरित्या तयार - ख्रिस गेल


मी मानसिकरित्या तयार आहे, कोणताही बॉलर असू दे, अश्विन असू दे नाहीतर दुसरं कुणी, असं ख्रिस गेलने यापूर्वीचं म्हटलं आहे. 


ख्रिस गेल म्हणतो, 'अश्विनशिवाय इतर बॉलर्सही फॉर्मात आहेत, आशिष नेहराही आहे, आम्हाला आमचे डोळे उघडे ठेवावे लागतील, सामन्याची स्थिती ओळखून खेळावं लागेल'. 'मी नेहमीच पॉझिटिव्ह असतो, कोण बॉलिंग करतोय हे मी पाहत नाही, मी आक्रमकताही सोडत नाही'.


गरज पडल्यास टीम इंडियात सल्ला देण्यासाठी हरभजन सिंह सारखा अनुभवी बॉलर देखील आहे.


गेलला आऊट करणे अशक्य नाही


ख्रिस गेलला आऊट करणे तसे अशक्य नाहीय. ख्रिस गेलची खासियत म्हणजे जोरदार षटकार लावणे. सुरूवातीला खेळताना ख्रिस गेल हा कूल असतो, नंतर तो आक्रमक होत जातो. बॉलर त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आणखी आक्रमक होतो.


ख्रिस गेलच्या आजूबाजूला गुड लेंथचा बॉल त्याच्याजवळ आला तर मात्र त्याला तो बॉल खेळणे कठीण होते, त्याच्या पाटदुखीचा विचार केला, तर गेलला जवळची मुव्हमेंट करण्याचा त्रास आहे.