नवी दिल्ली :  रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैशा ४२ किलोमीटर अंतर धावताना असताना भारताचं कोणीच तिला पाणी देण्यासाठी नव्हतं, असं ओ. पी. जैशाने म्हटलं आहे.


 प्रत्येक देशाला त्यांच देशाचे तांत्रिक अधिकारी एनर्जी ड्रिंक किंवा पाणी देऊ शकतात, इतर देशाचे तांत्रिक अधिकाऱ्यांकडून एनर्जी ड्रिंक किंवा पाणी घेता येत नाही.


मॅरेथॉन पूर्ण केल्यावर जैशा बेशुद्ध होऊन खाली कोसळली होती. जैशाला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. पण भारतीय पदाधिकाऱ्यांना तीन तास याविषयी काहीच माहिती नव्हती, असा जैशाने म्हटले आहे.


 प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्हना ही गोष्ट कळल्यानंतर, जैशा गतप्राण झाली की काय हे पाहण्यासाठी ते गेले, त्याचवेळी त्यांचा डॉक्टरांशी वाद झाल्याने, त्यांना १२ तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं. 


जैशाला महिला मॅरेथॉन स्पर्धेत ८९ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. जैशा बेशुद्ध पडली तरी तीन तासापर्यंत तिच्याकडे भारताचं कुणीही फिरकलं नाही