मोहाली : टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध खेळताना युवराज सिंगने लगावलेले ते सहा षटकार क्रिकेटरसिकांच्या आजही लक्षात आहेत. असेच षटकार युवराज पुन्हा लगावणार का असे एका छोट्या क्रिकेट चाहत्याने युवराजला विचारले असता युवराज म्हणाला, तुम्ही प्रार्थना करा, मी पुन्हा षटकार ठोकेन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील हैदराबाद सनरायजर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर युवराजने पीसीए स्टेडियममधील काही लहानग्यांशी चर्चा केली.  त्याने काही टिप्सही दिल्या.


यावेळी एका मुलाने युवराजला पुन्हा तसेच षटकार ठोकणार का असे विचारले. या प्रश्नावर उत्तर देताना तुम्ही प्रार्थना करा मी पुन्हा तीच कामगिरी करेन. त्यावेळी मी ते सहा षटकार कसे ठोकले मला नाही माहीत, असे तो म्हणाला.