मुंबई : टीम इंडिया चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेशच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर हा सुपर संडेचा सुपर मुकाबला रंगेल. ऑल राऊंड परफॉर्मन्स करणारी टीम इंडिया आता वर्ल्ड कप विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. 


ईशान किशनच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ टीम वर्ल्ड कप विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय टीमनं वर्ल्ड कप फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. सर्फराज खान, अनमोलप्रीत आणि रिषभ पंत यांच्या बॅटिंगच्या जोरावर या युवा टीमनं प्रतिस्पर्धी टीम्सना धारातीर्थ पाडलं. 


तर बॉलिंगमध्ये आवेश खान या युवा फास्ट बॉलरनं प्रतिस्पर्ध्यांची दांडी गुल केली. आता फायनल जिंकण्यासाठी या टीमला कॅरेबियन टीमच्या आव्हानाला सामोर जावं लागेल. विंडीजवर मात करण्यासाठी भारतीय टीमला पुन्हा एकदा सांघिक कामगिरी करुन दाखवावीच लागेल. 


सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का देत वेस्ट इंडिजनं फायनलमध्ये प्रवेश केलाय. विंडीज बॅट्समन आणि बॉलर्स या वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाच्या बॅट्समनसमोर वेस्ट इंडिज बॉलर अलजारी जोसेफचं आव्हानं असेल. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेटप्रेमींना एका शानदार लढतीची पर्वणी मिळणार यात काही शंकाच नाही.