धर्मशाळा : धर्मशालामध्ये टीम इंडियानं विजयी गुढी उभारलीय. भारतानं सामन्यासह 2-1 नं सीरिज जिंकलीय. डोंबिवलीकर अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात टीम इंडियाला मिळालेला हा पहिला विजय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताला जिंकण्यासाठी १०६ रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. केवळ दोन विकेट गमावत भारतानं हा विजय अगदी सहजच घशात घातला. लोकेश राहुल ५१ रन तर कार्यवाहक कॅप्टन अजिंक्य रहाणे ३८ रन्सवर खेळत नाबाद राहिले. ८ गडी राखून भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. 


टेस्टच्या चौथ्या दिवशी...


भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी भारतानं कोणताही विकेट न गमावता १९ रन्सवर खेळणं सुरू केलं. चौथ्या दिवशी के एल राहुल आणि मुरली विजय यांनी हा खेळ पुढे नेला. भारताला पहिला झटका मुरली विजयच्या रुपात लागला. ८ रन्सवर मुरलीला पेट कमिंसच्या बॉलवर मॅथ्यू वेडनं कॅच आऊट केलं.


मुरली विजय आऊट झाल्यानंतर पुजाराही मैदानात जास्त वेळ टिकू शकला नाही... आणि भोपळाही न फोडता तो रन आऊट झाला. त्यानंतर लोकेश आणि अजिंक्यनं मैदानाचा ताबा घेतला तो जिंकण्यासाठीच... 


ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३०० रन्स काढले होते. प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या डावात ३३२ रन्स केले... आणि सीरिजमध्ये ३२ रन्सची आघाडी घेतली. भारतीय बॉलर्सच्या शानदार प्रदर्शनात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १३७ वर ऑल आऊट झाले. भारताला ही मॅच जिंकण्यासाठी केवळ ८७ रन्सची गरज होती. 


भारत आणि ऑस्ट्रेलिय एक - एक टेस्ट जिंकून सीरिजमध्ये बरोबरीत आहे... या विजयासहीत टीम इंडियानं गावसकर - बॉर्डर ट्रॉफीवर ताबा मिळवलाय.