मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर आजपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत 'अ' संघ यांच्यात तीनदिवसीय सराव सामन्याला सुरुवात होतेय. भारताचा क्रिकेटर हार्दिक पांड्याकडे या सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वीचा हा सराव सामना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंची कसोटी लागणार आहे. 


सध्या भारतीय संघ दमदार फॉर्मात आहे. त्यामुळे संघाला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला त्यांची गोलंदाजी बळकट करावी लागेल. तसेच भारतीय खेळपट्ट्यांवर विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांचा कस लागेल. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अखिल हेरवाडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाझ नदीम, कृष्णप्पा गोवथाम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक दिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंग, बाबा इंदरजित यांचा समावेश आहे. 


सामन्याची वेळ - सकाळी साडेनऊ वाजल्यापासून.