मोहाली : भारत आणि इंग्लंडमध्ये मोहालीत तिसऱ्या टेस्टला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणम टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे, तर दुसरीकडे इंग्लिश टीमला सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिस-या टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये दुखापतग्रस्त  वृद्धीमान सहाऐवजी पार्थिव पटेलची वर्णी लागली आहे. 2012 नंतर पार्थिव टीममध्ये पुनरागमन करत आहे, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान त्याच्यासमोर असेल. कॅप्टन कोहलीनं आपल्या बॅटिंगनं इंग्लिश टीमला चांगलाच दणका दिलाय.


भारतीय बॉलर्सनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती. तर जो रुट, कॅप्टन ऍलिस्टर कूक आणि मोईन अलीपासून टीम इंडियाला सावध रहाव लागेल. जेम्स अँडरसनच्या भेदक मा-याचाही यशस्वी सामान करण्याचं आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. आता टीम इंडिया मोहली टेस्ट जिंकत सीरिजमध्ये 2-0 नं आघाडी घेते की, इंग्लिश टीम कमबॅक करण्यात यशस्वी ठरते ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.