ढाका : बांगलादेशात सुरु असलेल्या अंडर 18 आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात भारताने पाकिस्तानला 3-1  असे नमवले. या विजयामुळे भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.


पुढील महिन्यात मलेशिया येथे आयोजित कऱण्यात आलेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे वरिष्ठ हॉकी संघ एकमेकांशी भिडणार आहेत. 


उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतात वातावरण चांगलेच तापलेय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला नमवण्याचा निश्चय भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केलाय. 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील.