न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने न्यूजीलंडसोबतच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट टीमची निवड केली आहे. रोहित शर्मा हे या बैठकीमध्ये मुख्य चर्चेचा विषय होता कारण काही दिवसांपासून रोहित शर्माची कामगिरी हे टेस्ट मॅचेसमध्ये इतकी चांगली नव्हती. पण कर्णधार विराट कोहलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे टॉप ११ मध्ये नसला तरी टॉप १५ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने न्यूजीलंडसोबतच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट टीमची निवड केली आहे. रोहित शर्मा हे या बैठकीमध्ये मुख्य चर्चेचा विषय होता कारण काही दिवसांपासून रोहित शर्माची कामगिरी हे टेस्ट मॅचेसमध्ये इतकी चांगली नव्हती. पण कर्णधार विराट कोहलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे टॉप ११ मध्ये नसला तरी टॉप १५ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
निवड समितीने मागचीच टीम कायम ठेवली आहे. २२ सप्टेंबरपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे.
विराट कोहली -कर्णधार, के. एल. राहुल, पुजारा, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, रोहित शर्मा, अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, उमेश यादव, सहा, धवन,