भारताकडे 162 धावांची आघाडी
सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या.
किंगस्टन : सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या.
भारताला 162 धावांची आघाडी मिळालीयं. पुजारा 46 धावा करून रनआऊट झाल्यानंतर मॅचची धुरा लोकेश राहुलने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 182 बॉलमध्ये 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं आपल्या कारकिर्दीतील तिसरं शतक झळकावलं.
लोकेश अखेर 158 धावांवर ग्रेबियलच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने 90 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तर आश्निन तीन धावांवर पायचित झाला.
दरम्यान, लोकेश राहुलने आपल्या खेळीनं अजय जडेजाचं रेकॉर्ड तोडलं. यापूर्वी वेस्टइंडि़जमध्ये कसोटी सामन्यात पहिल्या डावात सर्वाधिक धावा अजय जडेजाच्या नावावर होत्या. जडेजाने 1996मध्ये 97 धावांची खेळी केली होती.