नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचकारी सामन्यात न्यूझीलंडने सहा धावांनी भारताला पराभूत केले. या पराभवासह तब्बल 11 वर्षांनी दिल्लीच्या मैदानावर भारताला पराभव सहन करावा लागला.


न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पेलताना भारताची सुरुवात मात्र अडखळती झाली. 73 धावांत भारताने पहिले चार गडी गमावले. 


केदार जाधव आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तो तितकासा यशस्वी ठरला नाही. हार्दिक पंड्यानेही 36 धावा करत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले खरे मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही आणि भारताचा संपूर्ण डाव 236वर संपुष्टात आला.