फ्लोरिडा : अमेरिकेमध्ये झालेल्या पहिल्याच टी20मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वेस्ट इंडिजनं भारताला एक रननं हरवलं आहे. 246 रनच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 ओव्हरमध्ये 244 रनपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या बॉलला दोन रनची आवश्यकता असताना ब्रॅव्होनं धोनीची विकेट घेतली आणि वेस्ट इंडिजला जिंकवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून के.एल.राहुलनं शानदार सेंच्युरी झळकवली. राहुलनं 51 बॉलमध्ये नाबाद 110 रन केल्या, तर रोहित शर्मानं 28 बॉलमध्ये 62 आणि धोनीनं 25 बॉलमध्ये 43 रन केल्या. 


याआधी टॉस जिंकून भारतानं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताच्या बॉलर्सनी मात्र धोनीचा हा निर्णय अयोग्य ठरवला. वेस्ट इंडिजच्या एविन लुईसनं 48 बॉलमध्ये सेंच्युरी झळकवली, तर जॉनसन चार्ल्सनं 33 बॉलमध्ये 79 रन केल्या. वेस्ट इंडिजनं 20 ओव्हरमध्ये 245 रन केल्या.