नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ खूप भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा हंगामी कर्णधार आहे ज्याने विराट कोहलीच्या शैलीपेक्षा वेगळ्या शैलीमध्ये आक्रमकपणे नेतृत्व केले, अशा शब्दात चॅपेल यांनी रहाणेचे कौतुक केलेय.


रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला. कर्णधार म्हणून रहाणेने आपली कामगिरी चोख बजावलीच त्यासोबतच दुसऱ्या डावात आक्रमक खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. 


हंगामी कर्णधार म्हणून नेतृत्व करणे सोपी गोष्ट नसते. कारण नियमित कर्णधाराची विशिष्ट शैली असते. त्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न तुमच्यासमोर असतो. मात्र रहाणेने आपल्या शैलीत संघाचे नेतृत्व उत्तम पद्धतीने केल्याचे चॅपेल पुढे म्हणाले.