मुंबई : वानखेडे टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था 6 बाद 182 अशी बिकट झाली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासोबतच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया चार पाऊलं दूर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीची डबल सेंच्युरी आणि जयंत यादवच्या सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 231 रन्सची आघाडी मिळाली. यानंतर दुस-या इनिंगसाठी मैदानात उतरलेल्या कुक सेनेला भुवनेश्वर कुमारनं दुस-याच बॉलला पहिला धक्का दिला आणि मग जाडेजानं कुकचा अडसर दूर केला. यानंतर मात्र भारतीय फिरकीच्या तिकडीपुढे इंग्लंडच्या बॅट्समन्सनी सपशेल लोटांगण घातलं.


जो रुटनं 77 रन्सची खेळी केली तर जॉनी बेयरस्टो चौथ्या दिवसअखेर 50 रन्सवर नाबाद आहे. आता पाचव्या दिवशी टीम इंडियाकडे 49 रन्सची आघाडी आहे. उर्वरित इंग्लंड बॅट्समन्सना झटपट आऊट करुन टेस्ट आणि सिरीज जिंकण्याच्या इराद्याने कोहली सेना मैदानात उतरेल.