विंडीज दौऱ्यातली आजपासून तिसरी कसोटी
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधली तिसरी कसोटी सेंट लुशियाच्या ग्रॉस आयलेटमधील डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
सेंट लुशिया : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधली तिसरी कसोटी सेंट लुशियाच्या ग्रॉस आयलेटमधील डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
वेस्ट इंडिजशी टीम इंडियाची लढत भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
टीम इंडियानं अँटिगाची पहिली कसोटी एक डाव आणि ९२ धावांनी जिंकून या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. पण पावसानं व्यत्यय आणलेल्या जमैकाच्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसनं झुंजार शतक ठोकून सामना अनिर्णित राखला.
टीम इंडियानं ही मालिका ३-० अशी जिंकली, तर भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. त्यामुळं सेंट लुशिया कसोटीत कोहली अँड कंपनी विजय मिळवण्याच्याच निर्धारानं खेळावं लागणार आहे.