मीरपूर: आजचा शनिवार क्रिकेट शौकिनांसाठी खास असणार आहे. कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर, आज एकमेकांना भिडणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेशमध्ये आशिया कप स्पर्धेत संध्याकाळी हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या स्पर्धेतला बांग्लादेश विरुद्धचा आपला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. त्यामुळे साहजिकच धोनी ब्रिगेडच्या धुरंधराचं मनोबल उंचावलंय. तर पाकिस्तानचा संघही टीम इंडियाला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.


 टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तेव्हाही भारत आणि पाकिस्तानमध्ये मॅच होणार आहे. त्याआधीची ही मॅच दोन्ही टीम्ससाठी एक चांगली संधी आहे. 


वर्षभरापूर्वी ऍडलेडमध्ये वर्ल्ड कपच्या निमित्तानं भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये मॅच झाली होती. ती मॅच भारतानं 76 रननी जिंकली होती. वर्ल्ड कपनंतर या दोन्ही संघामध्ये सीरिज होईल असंही बोललं गेलं, पण भारत सरकारनं परवानगी नाकारल्यानं ही सीरिज होऊ शकली नाही.