कोलकाता : कोलकाता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडला 178 रननं हरवलं. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही विजयांमुळे भारत आता टेस्टमध्ये नंबर एक होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची तिसरी टेस्ट शनिवारी 8 तारखेपासून इंदौरमध्ये सुरु होणार आहे. या टेस्टचा निर्णय काहीही लागला तरी भारत नंबर एकवर कायम राहणार आहे. आयसीसी लवकरच टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर करणार आहे. यामध्ये भारत नंबर एकवर पोहोचणार आहे.