पुणे : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर भारताचे कडवे आव्हान असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या १९ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधलीये. त्यामुळे घरच्या मैदानावर यजमानांना हरवणं पाहुण्यांसाठी नक्कीच कठीण जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारत ही परंपरा कायम राखेल असा भारतीय चाहत्यांना विश्वास आहे.


भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तर दुसरीकडे गोलंदाजीत अश्विनची कामगिरी दमदार होतेय. या मालिकेतही भारतीय क्रिकेटपटूंकडून अशाच कामगिरीची आशा असेल. 


भारतीय संघाचे तगडे आव्हान असले तरी यजमानांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्यासाठी पाहुणा संघ सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची मदार मुख्यत: स्मिथ, डेविड वॉर्नर यांच्यावर असेल. तर गोलंदाजीमध्ये नॅथन लॉयन याच्यावर सर्वांची नजर असेल.


सामन्याची वेळ : सकाळी नऊ वाजता.