बंगळूरु : पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात जसा खेळ झाला तितका वाईट खेळ आमच्याकडून होणार नाही अशी ग्वाही विराट कोहलीने दिलीय. बंगळुरुमध्ये आजपासून सुरु होणा-या टेस्टआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन टीमनं कसून सराव केलाय. यानंतर कोहलीनं माध्यमांशी संवाद साधला. 


पुणे टेस्टमधील पराभव मनाला लागला असून प्रत्येक पराभव काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे पुन्हा जोमानं कमबॅक करु आणि सीरीज खिशात घालू असा विश्वास कोहलीनं व्यक्त केलाय.


तर बंगळुरुच्या पीचवर पुन्हा एकदा नजरा असतील, मात्र इंग्लंडविरुद्धच्या सीरीजप्रमाणेच ही पीच असेल असा अंदाज ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव स्मिथनं वर्तवलाय. 


सामन्याची वेळ : सकाळी साडेनऊ वाजता