भारत vs बांग्लादेश : सौम्याचा अप्रतिम झेल
हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने अप्रतिम घेतला.
बंगळुरु : बांग्लादेशन टीम इंडिया १४६ रन्सवर रोखले. मात्र, या सामन्यात बांग्लादेशची फिल्डींग चांगली झाली. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने अप्रतिम घेतला.
टीम इंडियाचा रोहित शर्मा १८ रन्स काढून बाद झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच शिखर धवन तंबूत परतल्याने पाठोपाठ दुसरा धक्का बसला. शिखर धवनने २३ रन्स केल्या तर, आक्रमक फलंदाज विराट कोहलीही जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. त्याला २४ रन्सवर शुवागता होमने यष्टीचीत केले.
या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक जास्त रन्स केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत ३० रन्स केल्या. सुरेश रैना झेलबाद झाल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याही १२ रन्सवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने घेतला. तर युवराज सिंग अवघ्या ३ रन्स काढून तंबूत परतला. रवींद्र जडेजा १२ रन्सवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ रन्स केल्या, तर आर. आश्विनने पाच रन्स केवल्या.
बांग्लादेशकडून गोलंदाज अल अमीन हुसेन आणि मुस्तफिजुर रहमानने यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शुवागता होम, महमदुल्ला आणि शाकीबुल हसन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.