कानपूर : भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-ट्वेंटी सामना होत आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला. सकाळच्या सत्रात इंग्लंड संघाने, तर दुपारच्या सत्रात भारतीय संघाने सराव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड संघ सकाळी ९ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाला आणि त्यांनी १२.३० पर्यंत सराव केला. भारतीय संघाने दुपारी १ वाजल्यानंतर सरावाला सुरुवात केली. उभय संघातील सर्वच खेळाडू सराव सत्रामध्ये सहभागी झाले. सरावादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख होती.  


आजच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. सामना सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार असून ८ वाजेपर्यंत संपेल. हिवाळा असल्यामुळे सायंकाळी ५ वाजतानंतर दव पडण्यास सुरुवात होईल. त्याचा गोलंदाजांना लाभ मिळेल. अखेरच्या षटकांमध्ये चेंडू अधिक स्विंग होण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होईल.


टेस्ट आणि वन-डे सीरिज जिंकल्यानंतर आता कोहली अँड कंपनी टी-20 सीरिजवरही कब्जा करण्य़ासाठी आतूर आहे. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेट चाहत्यांना एक चित्तथरारक लढत पाहायला मिळणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाहुण्या इंग्लिश टीमला पराभूत करण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल. तर इंग्लिश टीम टेस्ट आणि वन-डे गमावल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये य़ा पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रय़त्नशील असेल.