मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर येत्या २६ जानेवारी भारत टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आलीये. टीममध्ये दोन बदल करण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलीये. बीसीसीआयच्या माहितीनुसार अश्विन आणि जडेजाला या मालिकेत विश्रांती देण्यात आलीये. त्यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांचा समावेश कऱण्यात आलाय.


तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ जानेवारी रोजी होणर आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर हा सामना रंगेल. 


अशी आहे टीम - विराट कोहली (कर्णधार), मनदीप सिंह, के एल राहुल, महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह, सुरेश रैना, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, परवेज रसूल, यजुवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आणि आशिष नेहरा.