कोलकाता : भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सिरीजमधील तिसरी आणि अखेरची मॅच कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने सिरीज खिशात घातलीय. त्यामुळे तिस-या वनडेत साहेबांना व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने कोहली सेना मैदानात उतरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आगामी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला नव्या चेह-यांना संधी देत काही प्रयोगक करण्याची संधी मिळणार आहे. या मॅचमध्ये शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला ओपनर म्हणून टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. 


दुखापत आणि खराब फॉर्ममुळे धवनचा टीममधील पत्ता कट होऊ शकतो. तर दुसरीकडे अखेरच्या वनडेत विजय मिळवण्याचा प्रयत्न इंग्लिश आर्मीचा असेल. याआधीच्या दोन्ही वनडेत साडेतीनशहून अधिक रन्स झालेत. त्यामुळे ईडन गार्डन्सवरही पुन्हा एकदा रन्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.